Showing posts with label काजु. Show all posts
Showing posts with label काजु. Show all posts

Sunday, April 4, 2010

काजू मटारांची उसळ


ओरिइजिनल रेसिपि कच्चे टोमॅटो घालून होती. इथे हिरवे टोमॅटो न मिळाल्याने मी त्याऐवजी ढोबळी मिरची चा वापर केला. ते पण चविष्ट लागले.मटारच्या ऐवजी पीजन पीज पण चांगले लागतात.

१. १/२ वाटी काजू
२. १ वाटी मटार
३. १ वाटी चिरलेली कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, १ टी स्पून जिरे, २ कच्चे हिरवे टोमॅटो (किंवा ढोबळी मिरची) सर्व जिन्नस एकत्र बारीक वाटून घेणे.
४. तेल मोहरी हिंग
५. मीठ, साखर

क़ूती:

१. मसाल्याचे सर्व सामान बारीक वाटून घेणे. काजू १/२ तास आधी भिजवून ठेवणे.

२. १ डाव तेलाची फोडणी घालावी. त्यात वाटलेला मसाला खमंग परतावा.

३. मटार किंचीत सोडा घालून उकडून घ्यावे.

४. परतलेल्या मसाल्यावर मटार व काजू घालावेत, २ वाट्या पाणी घालून झाकण ठेऊन २ मंद वाफा येऊ द्याव्यात.

५. चवीनुसार मीठ साखर, कोथिंबीर घालून उतरवावे.

Saturday, March 13, 2010

व्हेजिटेबल बिर्याणी


४ भांडी बासमती राइस
६ टे. स्पुन तुप
१ चमचा जिरे
५ तमालपत्र पान
३ हिरवे वेलदोडे
५ लवंगा
५ दालचिनीचे तुकडे

१/२ किलो फ्लॉवर
१/२ किलो बटाटे उकडुन
१/२ किलो लाल गाजर - पातळ उभे तुकडे
१ भोपळी मिर्ची
१ बीट
१ इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या वाटुन
१/२ किलो कांदे उभे पातळ चिरुन
पाव किलो टोमॅटो पातळ चिरुन
५० ग्रॅम काजु,२५ ग्रॅम बेदाणे

बिर्याणी मसाला - २ टे. धने, १ टे. सुके खोबरे, १ टे. खसखस, १ टे. बडीशेप, १ टे. स्पुन काजु तुकडा, ५ लवंगा, ३ दालचिनीचे तुकडे, ५ काळे मिरे, ५ सुक्या मिर्च्या, १ चमचा जिरे, मिठ - हे जिन्नस १ चमचा तेलावर भाजुन कुटुन घ्यावे. हा मसाला रेडिमेड पण मिळतो.
३० मिनिट तांदुळ कोमट पाण्यात घालुन ठेवावे
पातळ चिरलेला कांदा परतुन, काजु व बेदाणा परतुन बाजुला ठेवावे.

उकडलेल्या बटाट्याच्या गोल चकत्या कराव्यात

परतलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा बारीक वाटुन घ्यावा.
सर्वे भाज्या उकळत्या पाण्यात वाफवुन घ्याव्या
तांदुळ एका भांड्यात शिजवुन घ्यावा. (मी कुकरमधे शिजवुन घेते)

एका मोठ्या कढईमधे २ टे. तुपाची फोडणी करुन त्यात जिरे, तमालपत्र, वेलदोडे, लवंगा, दालचिनी घालुन त्यात कांदा, आल, लसुण घालुन सर्व भाज्या परतुन घ्यावा. त्यात भात व बिर्याणी मसाला घालुन नीट मिक्स करुन घ्यावे, सर्व्ह करतांना थोडा तळलेला कांदा व काजु, बेदाणे घालावे.

(सर्वे मिक्स करायच्या ऐवजी लेयर्स मधे सुध्दा बिर्याणी करता येते, लेयरस मधे - उकडलेले बटाटे- परतलेल्या भाज्या - भात - भाज्या)

पुलाव

पुलाव

१. दोन भांडी तांदुळ (शक्यतो बासमती)
२. पाव किलो फ्लॉवर
३. एक वाटीभर मटार, गाजर, दोन टोमॅटो, चार कांदे, आवडत असल्यास कॉर्न
४. एक इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या वाटुन
५. तीन चार लवंगा, दालचिनीचे दोन तुकडे
६. ४ हिरवे वेलदोडे, ८-१० काळे मिरे
७. १/२ चमचा जिरे
८. २-३ तमालपत्र पाने
९. मुठभर काजु
१०. २ टे.स्पुन साजुक तुप

कृती:
१) पुलाव करावयाच्या आधी तांदुळ निवडुन धुवुन निथळत ठेवावेत.
२) फ्लॉवरचे तुरे काढुन सोलावे, गाजर सोलुन मधला दांडा काढुन एक इंचाचे उभे तुकडे करावेत. मटार सोलुन घ्यावेत.
३) सर्व भाज्या एकत्र करुन धुवुन घ्याव्यात.
४) कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा.
५) २ टे.स्पुन तुप जाड बुडाच्या पातेल्यात तापायला ठेवावे. त्यात जिरे, लवंग, दालचिनीचे तुकडे, वेलची, तमालपत्राची पाने, काळे मिरे घालुन फोडणी करावी. त्यात कांदा घालावा. कांदा पारदर्शक झाला की, धुतलेल्या भाज्या घालाव्यात. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
६) मी वरील मिश्रणात तयार भात ऍड करते. पण ऑथेंटीक पुलावात वरील भाज्यांमधे तांदुळ परतावे. तांदुळ परतले गेले की तांदुळाच्या दुप्पट पाणी घालुन शिजवावे.
७) चवील मीठ, काजु ऍड करावे.