Sunday, April 11, 2010

दाल ढोकळी


२५० ग्रॅम तुर डाळ
२५० ग्रॅम कणीक
३ हिरव्या मिरच्या
३ चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट
५० ग्रॅम दाण्याचे कुट
२५ ग्रॅम काजु
१ चमचा हळद
१ चमचा मोहरी
३-४ लसून पाकळ्या
२ टमाटे बारीक चिरुन
१ चमचा चिंचेचा पल्प, १ चमचा साखर
चवीनुसार मीठ
१ चमचा गरम मसाला
१ चमचा ओवा
४-५ चमचे तेल
१ चमचा तिखट
१ चमचा जिरे
१/२ कप कोथिंबीर
३-४ चमचे तुप
कढीपत्ता

क्रुती:
१. कणकेमधे मीठ, हळद, ओवा, तिखट एकत्र करुन तेल व पाणी घालून कणीक मळावी.
२. तुर डाळ धुवून कुकर मधे शिजवून घ्यावी.
३. एका मोठ्या भांड्यात तेल गरम करुन त्यात लसूण, मोहरी, कढीपत्ता, जिर, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. ४. ४. त्यात शिजवलेली तुर डाळ, चिंचेचा पल्प, काजु, साखर, गरम मसाला, थोड तिखट, टमाटे, हळद, मीठ व २ वाट्या पाणी घालावे.
५. कणकेच्या मोठ्या पोळ्या लाटून त्याचे शंकरपाळ्याच्या साईझचे तुकडे करुन उकळत्या डाळीत घालावे.
१० मिनिट उकळू देऊन त्यावर कोथींबीर घालून सर्व्ह करावे.

1 comments:

Asha Joglekar said...

वा मस्तच. मी पण अशीच करते. म्हणजे मुटकुळी न करता शंकरपाळी करून घालते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.करतेच उद्या.

Post a Comment