Friday, April 2, 2010

उपमा


आमचे वडील म्हणतात की एका वेळेस फक्त मुठ भरेल एवढच अन्न खाव... तेवढच पचत. त्यामुळे दर दोन तासांनी माझी थोड थोड खाण्याची सवय. ते खाण हेल्थि असण गरजेच. कुठे चिप्सच खाल्ल्यात किंवा काहीतरी जंक चरल आहे अस घडू न देण्याचा प्रयत्न असतो. पण त्यामुळे आठवडाभराच्या स्नॅक्सच प्लॅनिंग कराव लागत.

मिर्ची, दही, कोथिंबीरीची चटणी + उपमा हे माझ आवडीच कॉंबीनेशन.

१. दोन वाट्या जाड रवा
२. १ कांदा चिरुन (अमेरिकेतल्या एका कांद्याचा साईझ जंबो असतो त्यामुळे छोटे असल्यास २ घालावे)
३. १ वाटी मटार
४. १ टोमॅटो
५. ३-४ हिरव्या मिरच्या व १/२ ते १ इंच आल वाटून
६. १०-१२ कढीलिंबाची पान, एखाद दोन सुक्या लाल मिरच्या
७. तेल
८. १/२ वाटी खवलेला ओला नारळ, मूठभर कोथिंबीर
९. मोहरी, जिरे, हिंग

क़ूती:

१. कढईत मंद आचेवर रवा गुलाबी रंगावर भाजून काढून ठेवावा. मी एका वेळेस बरीच क्वांटीटी भाजून फ्रिजमधे ठेवते. रवा फ्रिजमधे एखाद वर्ष अगदी छान राहतो.

२. एका पातेलीत तेलात फोडणी करावी. त्यात कढिलिंब, मिरच्या, कांदा, मटार, आल घालून परतून जरा वाफवून घ्यावे.

३. त्यात रवा टाकून थोडे परतून चवीनुसार मीठ, साखर, टोमॅटो घालून त्यात ४ वाट्या उकळलेले पाणी हळूहळू घालत सारखे ढवळावे.

४. सर्व पाणी घातल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर २ वाफा द्याव्यात.

५. तयार उपम्यावर खोबर, कोथिंबीर घालून खायला द्यावा (किंवा घ्यावा :))

ब्रेडचा उपमा:

१/२ ब्रेड कुस्करुन (शक्यतो ताजा नको)
१ कांदा बारीक चिरुन
तेल, मोहरी, हळद, तिखट
चवीनुसार मीठ साखर व अर्ध्या लिंबाचा रस
मूठभर कोथिंबीर

१. ब्रेड हाताने कुस्करुन घ्यावा. खुप बारीक करु नये.
२. पातेलीत तेल मोहरी हळद घालून फोडणी करावी व चिरलेला कांदा खमंग परतावा.
३. कांदा परतून त्यात पाव वाटी पाणी घालावे व त्यात १/२ चमचा तिखट, चवीनुसार मीठ व साखर घालावी व १/२ लिंबाचा रस घालून ढवळावे.
४. पातेल्यातले पाणी उकळले की कुस्करलेला ब्रेड घालून मंद आचेवर चांगली वाफ द्यावी.

0 comments:

Post a Comment