Friday, April 2, 2010

गुलाबजाम


गुलाबजाम करणे म्हणजे भरपूर वेळ + कष्ट अस माझ मत होत पण ते अगदीच चुकीच ठरल.

दिवस एक : रात्री रवा दुधात भिजवून ठेवला - वेळ २ मिनिट
दिवस दोन : खवा व रवा पुरण यंत्रातून काढून छोटे सारखे गोळे करून फ़्रिजमधे ठेवला - वेळ १० मिनिट
दिवस तीन : एकीकडे पाक करायला ठेवला व दुसरी कडे गुलाबजाम तळून घेतले, तळलेले गुलाबजाम गरम पाकात टाकून उकळी येवू दिली- वेळ २० मिनिट
टोटल वेळ ३२ मिनिट!

ट्राय करून बघा पटतय का ते!

*** अश्या रेसिपीज ट्राय करायला वजनाच्या काट्याचा खुपच उपयोग होतो.

१. पाव किलो खवा
२. १ छोटी वाटी बारीक रवा (१०० ग्रॅम)
३. १/२ वाटी दुध (१०० ग्रॅम रवा एका वाटीत घालून ती जेवढी भरेल त्याच्या निम्म्या प्रमाणात दुध)
४. ७-८ हिरव्या वेलदोड्याची पूड
५. १/२ चिमूट खायचा सोडा
६. ३ वाट्या साखर
७. ३ वाट्या पाणी
९. तळण्याकरता तेल अथवा तुप

क़ूती:

१. प्रथम रवा दुधामधे भिजवून २ तास झाकून ठेवावा (मी संपूर्ण रात्रभर ठेवलेला). तो पोळीच्या कणके इतपत सैल असावा.

२. रवा भिजल्यावर खवा व रवा एकत्र करून पुरणयंत्रातून काढून घेणे (पुरणयंत्राला मोठ्या भोकाची ताटली लावून)

३. रवा-खवा-वेलदोडा पावडर-सोडा सर्व चांगले मळून त्याचे एकसारखे २५-२६ छोटे गोळे करुन ते गॅसवर तेलात किंवा तुपात तळून कागदावर ठेवावे.

४. एका पसरट पातेल्यात ३ वाट्या साखर + ३ वाट्या पाणी गॅसवर ठेवून एक उकळी आली की गॅस बंद करणे.

५. हा पाक कोमट झाला की त्यात गोळे घालून मंद आचेवर ठेवावे. एक उकळी आली की उतरवावे.

६. ५-६ तास मुरल्यावर वाढावेत.

गुलाबजाम गरम/थंड कसेही चांगले लागतात. शिवाय गरम गुलाबजाम वर २ स्कुप व्हनिला आइसक्रीम हे कॉंबिनेशन पण अमेझिंग लागत.

0 comments:

Post a Comment