Sunday, April 11, 2010

दाल ढोकळी


२५० ग्रॅम तुर डाळ
२५० ग्रॅम कणीक
३ हिरव्या मिरच्या
३ चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट
५० ग्रॅम दाण्याचे कुट
२५ ग्रॅम काजु
१ चमचा हळद
१ चमचा मोहरी
३-४ लसून पाकळ्या
२ टमाटे बारीक चिरुन
१ चमचा चिंचेचा पल्प, १ चमचा साखर
चवीनुसार मीठ
१ चमचा गरम मसाला
१ चमचा ओवा
४-५ चमचे तेल
१ चमचा तिखट
१ चमचा जिरे
१/२ कप कोथिंबीर
३-४ चमचे तुप
कढीपत्ता

क्रुती:
१. कणकेमधे मीठ, हळद, ओवा, तिखट एकत्र करुन तेल व पाणी घालून कणीक मळावी.
२. तुर डाळ धुवून कुकर मधे शिजवून घ्यावी.
३. एका मोठ्या भांड्यात तेल गरम करुन त्यात लसूण, मोहरी, कढीपत्ता, जिर, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. ४. ४. त्यात शिजवलेली तुर डाळ, चिंचेचा पल्प, काजु, साखर, गरम मसाला, थोड तिखट, टमाटे, हळद, मीठ व २ वाट्या पाणी घालावे.
५. कणकेच्या मोठ्या पोळ्या लाटून त्याचे शंकरपाळ्याच्या साईझचे तुकडे करुन उकळत्या डाळीत घालावे.
१० मिनिट उकळू देऊन त्यावर कोथींबीर घालून सर्व्ह करावे.

Sunday, April 4, 2010

काजू मटारांची उसळ


ओरिइजिनल रेसिपि कच्चे टोमॅटो घालून होती. इथे हिरवे टोमॅटो न मिळाल्याने मी त्याऐवजी ढोबळी मिरची चा वापर केला. ते पण चविष्ट लागले.मटारच्या ऐवजी पीजन पीज पण चांगले लागतात.

१. १/२ वाटी काजू
२. १ वाटी मटार
३. १ वाटी चिरलेली कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, १ टी स्पून जिरे, २ कच्चे हिरवे टोमॅटो (किंवा ढोबळी मिरची) सर्व जिन्नस एकत्र बारीक वाटून घेणे.
४. तेल मोहरी हिंग
५. मीठ, साखर

क़ूती:

१. मसाल्याचे सर्व सामान बारीक वाटून घेणे. काजू १/२ तास आधी भिजवून ठेवणे.

२. १ डाव तेलाची फोडणी घालावी. त्यात वाटलेला मसाला खमंग परतावा.

३. मटार किंचीत सोडा घालून उकडून घ्यावे.

४. परतलेल्या मसाल्यावर मटार व काजू घालावेत, २ वाट्या पाणी घालून झाकण ठेऊन २ मंद वाफा येऊ द्याव्यात.

५. चवीनुसार मीठ साखर, कोथिंबीर घालून उतरवावे.

Friday, April 2, 2010

उपमा


आमचे वडील म्हणतात की एका वेळेस फक्त मुठ भरेल एवढच अन्न खाव... तेवढच पचत. त्यामुळे दर दोन तासांनी माझी थोड थोड खाण्याची सवय. ते खाण हेल्थि असण गरजेच. कुठे चिप्सच खाल्ल्यात किंवा काहीतरी जंक चरल आहे अस घडू न देण्याचा प्रयत्न असतो. पण त्यामुळे आठवडाभराच्या स्नॅक्सच प्लॅनिंग कराव लागत.

मिर्ची, दही, कोथिंबीरीची चटणी + उपमा हे माझ आवडीच कॉंबीनेशन.

१. दोन वाट्या जाड रवा
२. १ कांदा चिरुन (अमेरिकेतल्या एका कांद्याचा साईझ जंबो असतो त्यामुळे छोटे असल्यास २ घालावे)
३. १ वाटी मटार
४. १ टोमॅटो
५. ३-४ हिरव्या मिरच्या व १/२ ते १ इंच आल वाटून
६. १०-१२ कढीलिंबाची पान, एखाद दोन सुक्या लाल मिरच्या
७. तेल
८. १/२ वाटी खवलेला ओला नारळ, मूठभर कोथिंबीर
९. मोहरी, जिरे, हिंग

क़ूती:

१. कढईत मंद आचेवर रवा गुलाबी रंगावर भाजून काढून ठेवावा. मी एका वेळेस बरीच क्वांटीटी भाजून फ्रिजमधे ठेवते. रवा फ्रिजमधे एखाद वर्ष अगदी छान राहतो.

२. एका पातेलीत तेलात फोडणी करावी. त्यात कढिलिंब, मिरच्या, कांदा, मटार, आल घालून परतून जरा वाफवून घ्यावे.

३. त्यात रवा टाकून थोडे परतून चवीनुसार मीठ, साखर, टोमॅटो घालून त्यात ४ वाट्या उकळलेले पाणी हळूहळू घालत सारखे ढवळावे.

४. सर्व पाणी घातल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर २ वाफा द्याव्यात.

५. तयार उपम्यावर खोबर, कोथिंबीर घालून खायला द्यावा (किंवा घ्यावा :))

ब्रेडचा उपमा:

१/२ ब्रेड कुस्करुन (शक्यतो ताजा नको)
१ कांदा बारीक चिरुन
तेल, मोहरी, हळद, तिखट
चवीनुसार मीठ साखर व अर्ध्या लिंबाचा रस
मूठभर कोथिंबीर

१. ब्रेड हाताने कुस्करुन घ्यावा. खुप बारीक करु नये.
२. पातेलीत तेल मोहरी हळद घालून फोडणी करावी व चिरलेला कांदा खमंग परतावा.
३. कांदा परतून त्यात पाव वाटी पाणी घालावे व त्यात १/२ चमचा तिखट, चवीनुसार मीठ व साखर घालावी व १/२ लिंबाचा रस घालून ढवळावे.
४. पातेल्यातले पाणी उकळले की कुस्करलेला ब्रेड घालून मंद आचेवर चांगली वाफ द्यावी.

गुलाबजाम


गुलाबजाम करणे म्हणजे भरपूर वेळ + कष्ट अस माझ मत होत पण ते अगदीच चुकीच ठरल.

दिवस एक : रात्री रवा दुधात भिजवून ठेवला - वेळ २ मिनिट
दिवस दोन : खवा व रवा पुरण यंत्रातून काढून छोटे सारखे गोळे करून फ़्रिजमधे ठेवला - वेळ १० मिनिट
दिवस तीन : एकीकडे पाक करायला ठेवला व दुसरी कडे गुलाबजाम तळून घेतले, तळलेले गुलाबजाम गरम पाकात टाकून उकळी येवू दिली- वेळ २० मिनिट
टोटल वेळ ३२ मिनिट!

ट्राय करून बघा पटतय का ते!

*** अश्या रेसिपीज ट्राय करायला वजनाच्या काट्याचा खुपच उपयोग होतो.

१. पाव किलो खवा
२. १ छोटी वाटी बारीक रवा (१०० ग्रॅम)
३. १/२ वाटी दुध (१०० ग्रॅम रवा एका वाटीत घालून ती जेवढी भरेल त्याच्या निम्म्या प्रमाणात दुध)
४. ७-८ हिरव्या वेलदोड्याची पूड
५. १/२ चिमूट खायचा सोडा
६. ३ वाट्या साखर
७. ३ वाट्या पाणी
९. तळण्याकरता तेल अथवा तुप

क़ूती:

१. प्रथम रवा दुधामधे भिजवून २ तास झाकून ठेवावा (मी संपूर्ण रात्रभर ठेवलेला). तो पोळीच्या कणके इतपत सैल असावा.

२. रवा भिजल्यावर खवा व रवा एकत्र करून पुरणयंत्रातून काढून घेणे (पुरणयंत्राला मोठ्या भोकाची ताटली लावून)

३. रवा-खवा-वेलदोडा पावडर-सोडा सर्व चांगले मळून त्याचे एकसारखे २५-२६ छोटे गोळे करुन ते गॅसवर तेलात किंवा तुपात तळून कागदावर ठेवावे.

४. एका पसरट पातेल्यात ३ वाट्या साखर + ३ वाट्या पाणी गॅसवर ठेवून एक उकळी आली की गॅस बंद करणे.

५. हा पाक कोमट झाला की त्यात गोळे घालून मंद आचेवर ठेवावे. एक उकळी आली की उतरवावे.

६. ५-६ तास मुरल्यावर वाढावेत.

गुलाबजाम गरम/थंड कसेही चांगले लागतात. शिवाय गरम गुलाबजाम वर २ स्कुप व्हनिला आइसक्रीम हे कॉंबिनेशन पण अमेझिंग लागत.